• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
December 13, 2023
in इतर घडामोडी
0
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी
0
SHARES
1
VIEWS

दिनांक 14 डिसेंबर रोजी केंद्रीय पथकातील सदस्य करमाळा तालुक्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या दुष्काळग्रस्त गावातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार

सोलापूर:-यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील 45 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून ही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने आज माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी पिकांची पाहणी केली. यावेळी दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी व पाझर तलावाची ही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.


या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव श्रीमती सरोजिनी रावत यांचा समावेश आहे. या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुळेवाडी तालुका माळशिरस येथून केली. येथील शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली तर शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतातील विहिरीतील पाणी पातळीची पाहणी ही पथकाकडून करण्यात आली. शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची ही पाहणी पथकाकडून करण्यात आली. तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, ज्वारी, ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. के. वाघमोडे, सोलापूर लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए .जे शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन एस नरळे यांच्यासह तहसिलदार सुरज शेजुळ, संतोष कणसे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आनंद लोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, शिवाजी शिंदे तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय दुष्काळ पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी, पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था, जनावरांचा चारा, पाणी पातळीची खोली आदी कामे याबाबत पाहणी करून माहिती घेतली.यावेळी कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत असून तातडीने चारापाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, ऊस व अन्य पिकांची माहिती दिली. या नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्याकडे केली.

केंद्रीय पथकाचा पाहणी अहवाल
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी व शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तर उद्या दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी करमाळा तालुक्यातील मलवडी, घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची चर्चा केली जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणीनुसार केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येईल व त्यानंतर केंद्र शासनाकडून त्या अहवालानुसार मदत जाहीर करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते.

Previous Post

वृद्धांना आर्थिक आधार देणारी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

Next Post

खासदार डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते बोरमणीत ६११ महिलांना गॅस जोडणी

Related Posts

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
Next Post
खासदार डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते बोरमणीत ६११ महिलांना गॅस जोडणी

खासदार डॉ. शिवाचार्य यांच्या हस्ते बोरमणीत ६११ महिलांना गॅस जोडणी

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026