सांगली ( सुधीर गोखले ) – भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागताच त्यांनी राज्यभरातील जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील पक्षांतर्गत बदल केल्याने भाजप कार्यकर्ते रिचार्ज झाले असून काही ठिकाणी नवीन तर काही ठिकाणी निष्ठावंतांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काहीशी अशीच गोष्ट सांगली जिल्ह्याच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. वाळवा तालुका हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी(शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो याच तालुक्यातील इस्लामपुरात आ.जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे आणि इस्लामपूर नागरपालीचे पहिले लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सारख्या नव्या चेहऱ्याला ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देऊन एकप्रकारे तगडे आव्हान उभे केले आहे यामुळे इस्लामपूर आणि वाळवा परिसरात भाजप रिचार्ज झाला असून सध्या निशिकांत भोसले यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भविष्यात या भागात भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये चांगला आणि रंगतदार सामना पाहायला मिळेल तर अधिक संघर्षपूर्ण वातावरण राहणार आहे निशिकांत भोसले पाटील यांच्या रूपाने वाळवा तालुक्याला चौथ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळत आहे यापूर्वी माजी मंत्री अण्णा डांगे, बाबासो सूर्यवंशी, सी बी पाटील यांना संधी मिळाली होती यापूर्वी तालुक्यामधील भाजप ची ताकद हि नगण्य होती मात्र आता वाडी वस्त्यांवरून निशिकांत भोसले पाटील यांनी भाजप चा प्रचार आणि प्रसार जोमाने केला आहे कदाचित त्यांची अध्यक्षपदी निवड हि त्याचेच फलित असावे. वाळवा तालुक्यामध्ये आम जयंत पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गौरव नायकवडी, राहुल महाडिक, आनंद पवार, निशिकांत भोसले पाटील विक्रम पाटील हे आम पाटील यांचे प्रमुख विरोधक राहिले आहेत या सर्वानी जयंत पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण आम जयंत पाटील यांनी नेहमी विरोधकांना पाणी पाजले पण यंदा निशिकांत भोसले पाटील यांच्या कडे पक्षाने विश्वासाने आणि विशेष जबाबदारी दिली असून ग्रामीण भागात भाजप ची पकड अधिक मजबूत करून वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाला मोठे आव्हान निशिकांत भोसले पाटील यांच्या कडे असेल.
ना अजित पवारांमुळे अधिक ताकद
नुकतेच अजित पवार गटाने राज्यात भाजप ला साथ देत सत्तेमध्ये सहभागी झाले उपमुख्यमंत्री पदासह नऊ मंत्रीपदे मिळाली याचीही बेरीज निशिकांत भोसले पाटील यांना या मतदारसंघात निश्चित बळ देईल ना अजित पवार आणि आम जयंत पाटील यांचे फारसे सख्य कधीही दिसून आले नाही आता तर पक्षात उभी फूट पडली आणि हा संघर्ष आणखी वाढला आहे याचाही फायदा निशिकांत भोसले पाटील याना होऊ शकतो.