हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोहरम शांततेत साजरा करावे – एपीआय सनगले

0
32

दक्षिण सोलापूर, दि. 21- हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोहरमचा उत्सव शांततेत साजरा करावे, असे आवाहन वळसंग पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी केले.

मोहरम उत्सवानिमित्त शुक्रवारी इंगळगी येथे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना मोहरम उत्सवानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

सनगले म्हणाले की, वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास प्रत्येक गावामध्ये मोहरमचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त पंजाची स्थापना करून धार्मिक विधी केले जातात. अनेक ठिकाणी मोठ्या मिरवणुका निघतात. हिंदू मुस्लिम बांधवांकडून हा उत्सव साजरा केला जातो. उत्सव साजरा करत असताना पंच कमिटीकडून भाविकांसाठी योग्य त्या सोयी सुविधा पुरविणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्येकाने आपल्याकडून इतरांच्या भावना दुखावतील, असे वर्तन न करता शांततेत हा उत्सव साजरा करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बैठकीस मोहरम उत्सव पंच कमिटीचे अध्यक्ष अमर पाटील, सुभाष उपासे, शिलीसिद्ध कोटे, विद्याधर वळसंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज गाडेकर, शशिकांत वळसंगे, नवाज शेरीकर, काशिम शेख, जीलानी बागवान, विष्णू माने, प्रधान गुरव आदी उपस्थित होते.