• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2023
in इतर घडामोडी
0
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, गोची, ढोर व होलार ) व्यक्तींचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन २०२३-२४ मध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अनुदान योजना आणि बीजभांडवल योजनेसाठी अटी व शर्तीनुसार महामंडळाच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे यापुर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्द करण्यात येतील. स्वहस्ताक्षरात, टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अन्यथा कर्जप्रस्ताव अपात्र करण्यात येईल. अर्जदार यांनी परिपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही.

अर्जदारांकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी असावी. अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात अडथळा या सदराखाली संबंधित मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस / महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पद्धतीने कर्जप्रस्ताव जेष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची छायांकित प्रत, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन (जीएसटी सह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता परवाना अथवा बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल अथवा टॅक्सपावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. (NSFDC) योजनेअंतर्गत जुन्या प्रलंबित कर्जप्रस्तावाबाबत ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वी जिल्हा कार्यालयात कर्जप्रस्ताव दाखल केलेले आहेत. आणि ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करून कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, ज्या जागी व्यवसाय चालू करावयाचा आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला सोबत जोडावा.दोन सक्षम जामीनदारापैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र आवश्यक आहे.लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक आहे.

जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस,लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर,अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे,रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र, जातीचा दाखला, लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक,आधार संलग्न (लिंक) बँक खाते क्रमांक, जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक,अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली असून आहे.चर्मकार समाजातील बांधवांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ दाखल करुन जास्तीत जास्त अर्जदारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Previous Post

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी 8 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post

सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी माहिती अद्यावत करावी; सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी माहिती अद्यावत करावी; सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी माहिती अद्यावत करावी; सहाय्यक कामगार आयुक्त यांचे आवाहन

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026