माजी आमदार दिलीप माने यांच्या मालकीचा असलेला तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखाना पुन्हा चर्चेत आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील योगिनाथ मिटकरी यांनी याबाबत सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. योगिनाथ मेटकरी ,गणपत मोरडे आणि पंडित मेटकरी या शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे सात लाख तेवीस हजार सहाशे रुपयांचे कर्ज उचलल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.











