• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित

by Yes News Marathi
February 2, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे राज्यातील विद्यापीठातील परीक्षा पद्धतीवर मोठा परिणाम होतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजवर बहिष्कार आंदोलन सुरू केल्याने पुढील आदेशापर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात BA, BSC, BBA, LAW काही विभागाच्या सुरु आहेत किंवा काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजवर बहिष्कार आंदोलन सुरु केल्याने परीक्षावर परिणाम झाला आहे. 2016 पासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतो. राज्यातील 288 पैकी जवळपास 200 आमदारांना यासंदर्भात पत्र दिले आहे. सर्व खासदाराने देखील या संदर्भात कळवलेले आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांकडे देखील निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र या मागण्यांची दखल न घेतल्याने आजपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत. 20 फेब्रुवारीपासून परीक्षेसह सर्वच पद्धतीच्या कामकाज बंद करण्याचा इशारा महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला.
दरम्यान, 23 जानेवारीपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर काही विभागाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अशातच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे.
कोविडमध्ये ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर आधीच दडपण होते. परीक्षा केंद्रावर ती आल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे सांगितल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ होत आहे. अनेक विद्यार्थी परगावहून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानीसह मानसिक देखील नुकसान होत आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशा पद्धतीची भूमिका घ्यावी. अशी प्रतिक्रिया विध्यार्थ्यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा स्थगित
शिवाजी विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. विविध मागण्यांसाठी आजपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. परीक्षेची पुढील तारीख आणि माहिती संकेस्थळावर कळवली जाईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

Previous Post

रकुल प्रीत सिंगने लाइम ग्रीन आउटफिट घातलेला तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे

Next Post

सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का; मानस पगार यांचे अपघाती निधन

Next Post
सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का;  मानस पगार यांचे अपघाती निधन

सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का; मानस पगार यांचे अपघाती निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group