• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्वामींच्या सायकल बॅंकेला महाराष्ट्र बॅंकेने दिली गती

by Yes News Marathi
September 16, 2022
in मुख्य बातमी
0
स्वामींच्या सायकल बॅंकेला महाराष्ट्र बॅंकेने दिली गती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये परिस्थितीमुळे केवळ सायकल नसल्यामुळे शाळा सोडावी लागते. ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सायकल बॅंकेची संकल्पना मांडली. त्यांनी जिल्ह्यातील दानशूर नागरिक व संस्थांना सायकल बॅंकेसाठी लोकसहभागासाठी आवाहन केले. माळशिरस तालुक्यातील निमगाव मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून आज महाराष्ट्र बॅंकेने सायकल बॅंकेसाठी 25 सायकली भेट दिल्या. महाराष्ट्र बॅंकेचे झोनल मॅनेजर दत्तात्रय कावेरी यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात 25 सायकली मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी बोलताना दत्तात्रय कावेरी म्हणाले की मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक दायित्व पार पाडण्याची एक चांगली संधी सीईओ स्वामी यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महाराष्ट्र बॅंकेच्या वतीने सीईओ स्वामी यांचे आभार मानतो. आज महाराष्ट्र बॅंकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 25 सायकली सी एस आर फंडातून जिल्हा परिषदेच्या सायकल बॅंकेसाठी देताना आनंद होतो आहे.

सीईओ स्वामी म्हणाले की मागील सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या या उपक्रमास जिल्हाभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम न राहता एक चळवळ झाली आहे. यामाध्यमातून मुलींच्या शिक्षणाला मोठा हातभार लागत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. या निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाओ चा उद्देश पूर्ण पुर्ण होतोय.
यावेळी नवनीत किंग, डेप्युटी झोनल मॅनेजर, बॅक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, लेखाधिकारी कैलास कुंभार, चंद्रकांत पाटील, संजय अंबोले यांच्यासह अर्थ विभागातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

एकनाथ शिंदे साहेबांमुळे आज शिवसेना उभी आहे : नारायण राणे

Next Post

ज.रा.चंडक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप

Next Post
ज.रा.चंडक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप

ज.रा.चंडक प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झेप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group