• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवा सेनेच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या विरोधात तोंड फोडो आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2022
in मुख्य बातमी
0
युवा सेनेच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या विरोधात तोंड फोडो आंदोलन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून त्यांना नामोहरम करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आता स्वतः घोटाळ्याप्रकरणी उघडे पडले आहेत .आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा किरीट सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे या मागणीसाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पार्क चौक येथील शिवसेनेच्या कार्यालयासमोर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर प्रतीकात्मक हाथोडा मारून सोमय्यांचे तोंड फोडो आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले .

भ्रस्ट सोमय्या हाय हाय,सोमय्यांच्या भ्रष्टाचाराने भाजपचा बुरखा फाडला,निषेध असो निषेध असो,किरीट सोमय्यांचा निषेध असो,सोमय्या मुर्दाबाद, ईडीचा राडा, सोमय्यांना गाडा, भ्रष्ट सोमय्यांची भाजपमधून हकालपट्टी झालीच पाहिजे, देशाची सुरक्षा सोमय्यांकडून वेशीवर, शिवसेना झिंदाबाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

२०१३ सालामध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यासाठी असमर्थता दाखविल्यानंतर सोमय्या पुढे आले आणि त्यांनी त्यासाठी रेल्वे स्थानक तसेच विमानतळावर डबे घेऊन कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला .आयएनएस विक्रांत ही देशाची शान असल्यामुळे या भावनेपोटी सामान्यातील सामान्य माणसांनी सढळ हाताने मदत केली. इतकेच नव्हे तर नौदलाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा यासाठी हजारो रुपये दिले. मात्र जमा झालेला हा कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचलाच नाही. या गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांचे सोमय्या यांनी काय काय केले ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर माहितीच्या अधिकारात मिळालेली धक्‍कादायक माहिती देशासाठी चिंतेची बाब बनली आहे.किरीट सोमय्या यांनी गोळा केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी राजभवनात पोहोचलाच नाही आणि दुसऱ्याचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणण्याचे नाटक करणाऱ्या सोमय्या यांचे पितळ उघडे पडले.

सोमय्या यांनी १०० कोटींचा घोटाळा करून सामान्य जनतेने आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी दिलेल्या पैशातून स्वतःच्या बांधकाम व्यवसाय व निवडणूक खर्चासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे स्मारक तयार करण्यासाठी राजभवन येथे निधी जमा करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि तो स्वतः वापरल्याचा संशय असून अशा देशद्रोही कृत्यामुळे किरीट सोमय्याला राज्यातच नव्हे तर देशातही राहण्याचा अधिकार नाही .त्यांची जागा तुरुंगातच असली पाहिजे, अशी मागणी करत किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या कोट्यावधी निधीचे काय केले ? याचे उत्तर महाराष्ट्रातील तमाम जनता भाजपकडून मागत आहे .

किरीट सोमय्या स्वतः उघडे पडले असल्यामुळे भाजपाचा ना खाउंगा ना खाने दुंगा चा बुरखा पुरता फाटला गेला आहे .स्वतः प्रामाणिक असल्याचा आव आणून दुसऱ्याच्या घरावर हाथोडा मारण्याचे नाटक करून प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट करणारे किरीट सोमय्या आता स्वतः च भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. किरीट सोमय्या यांची बडबड बंद करण्यासाठी अखेर सोलापूर शिवसेनेला त्यांच्या तोंडावर हाथोडा मारून भ्रष्टाचाराला मुठमाती देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.

Previous Post

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेकडून सन्मान

Next Post

संजय राऊतांनी मला धमकावून २५ लाख रुपये घेतले : मोहित कंबोज

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
संजय राऊतांनी मला धमकावून २५ लाख रुपये घेतले : मोहित कंबोज

संजय राऊतांनी मला धमकावून २५ लाख रुपये घेतले : मोहित कंबोज

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026