केंद्रीय महामार्ग मंत्री नीतीन गडकरी हे महिनाअखेर ला सोलापूर दौर्यावर येणार आहेत. सोलापूर विजापूर या महामार्गातील केगाव ते हत्तुर बायपासचे काम देखील 20 एप्रिल पर्यंत पूर्ण होणार आहे त्यामुळे गडकरी यांच्या हस्तेच या महिनाअखेर ला सोलापूर विजापूर या महामार्गाचे लोकार्पण तसेच सुरत ते चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूमिपूजन समारंभ होण्याची शक्यता आहे. सोलापूर ते सांगली सोलापूर ते अक्कलकोट हे महामार्ग देखील नव्याने तयार झाले आहेत त्यामुळे त्यांचा लोकार्पण सोहळा देखील होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका येत्या सहा महिन्यात होणार आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर गडकरींचा हा दौरा भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार आहे शिवाय सोलापूर शहरातील दोन लहान मुलांसाठी गडकरी यांनी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र महापालिकेच्या संथ गतीचा कारभारामुळे आणि भूसंपादन न झाल्यामुळे आजूबाजूचे सर्व महामार्ग तयार झाले तरी गेल्या सहा वर्षांत हे उड्डाणपूल झाले नाही अजूनही यासंदर्भात संभ्रम कायम आहे त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने देखील या सर्व विकासाच्या प्रश्नाकडे प्रकाश टाकला जाणार आहे. गडकरींच्या दौऱ्याची तारीख नक्की नाही मात्र महिनाअखेरपर्यंत ते येणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.