सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने रविवार पेठ, तुळजापूर वेस, मोदी नॅशनल पार्क,रामवाडी, जगजीवन राम आणि भद्रावती पेठ, वाडिया मिनी शॉपिंग सेंटर या सात मिनी शॉपिंग सेंटरमधील थकबाकी पोटी सील केले होते. त्यांची ऑफलाईन पद्धतीने लिलाव दि.4 एप्रिल 2022 रोजी लिलाव करण्यात येणार आहे.
1)रविवारपेठ मिनी शॉपिंग(गाळा नंबर १३ सकाळी 10:00वाजता)
2) तुळजापूरवेस मिनी शॉपिंग सेंटर (गाळा नंबर ११ सकाळी 11:00 वाजता)
3)मोदी नॅशनल पार्क मिनी शॉपिंग सेंट(गाळा नंबर २,११,१२,१६,१७,१८,२० वेळ-दुपारी 12:00 वाजता)
4)रामवाडी मिनी शॉपिंग सेंट(गाळा नंबर३,१४ वेळ-दुपारी 3:00 वाजता)
5)वाडीया मिनी शॉपिंग सेंटर(गाळा नंबर वेळ-दुपारी 4:00 वाजता
6)जगजीवनराम मिनी शॉपिंग सेंटर (गाळा नंबर ४,५ वेळ 5:00 वाजता)
7)भद्रवती पेठ मिनी शॉपिंग सेंटर(गाळा नंबर 2 वेळ 5:00वाजता.)
तरी इच्छुकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. भाग घेण्यासाठी प्रवेश फी 300/-रुपये, 2 आयडेंटिटी कार्ड साईझ फोटो,आधार कार्ड, पॅन कार्ड यांची स्व-साक्षांकित प्रत घेऊन यावी.सदरचा लिलाव ज्या त्या ठिकाणी होईल याची नोंद घ्यावी. अधिकच्या माहितीसाठी भूमी मालमत्ता विभागाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.