सिध्देश्वर फाउंडेशन आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात
सोलापूर : सोलापूर शहर सुंदर व हरित करण्यासाठी महिलांनी पुढे यावे महिला आजही कुठे कमी नाहीत मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तनाचा बदल जो आहे तो महिलांनी ठासून घेतले पाहिजे की आपण अगोदरच पासूनच पुरूषांच्या पुढे आहोत यामुळेच पुरूषांना हेवा वाटत असल्याचे प्रतिपादन सोमपा उपायुक्त धनराज पांडे यांनी श्री सिध्देश्वर सोशल फौंडेशनच्या महिला दिनानिमित्त आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात केले .
याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे, उद्योगपती सुधीर खरटमल, महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे मुख्य प्रवर्तक व संस्थेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे ,जनकल्याण मल्टिस्टेटचे अध्यक्ष राजेंद्र हजारे, नगरसेविका श्रीदेवी फुलारी ,समाजसेविका जान्हवी माखीजा , फिटनेस कोच शितल जिरगे श्री सिध्देश्वर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद मुस्तारे उपाध्यक्षा प्रिया बसवंती , सचिव विकास कस्तुरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पांडे म्हणाले की आजही सोलापूर महानगरपालिकेत अशा काही महिला नगरसेविका आहेत की पुरुष नगरसेवका पेक्षाही आवाज मोठा आहे . सोलापूरचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर काळाच्या पुढे जाऊन काही तरी वेगळे विचार करावयाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमातील निवड केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सत्कारमुर्ती रणरागिणींचे मनोगतात व्यक्त केलेल्या सोलापूर व येथील श्री सिध्देश्वर महाराजांचे असलेले महत्त्व ओळखून सोलापूर हे धार्मिक पर्यटन स्थळ होण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासन व माजी महापौर महेश कोठे यांच्या साक्षीने राजकीय पक्षही तयार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . तसेच आता सोलापूरातील वातावरण हे साँफ्टवेअर हब होण्यासाठी अनुकूल असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत श्री सिध्देश्वर सोशल फौंडेशन चे उपायुक्त धनराज पांडेनी विशेष कौतुक केले
सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या डॉक्टर असूनही एमबीएची ही डिग्री मिळवली नावाच्या पुढे डिग्री लावण्यापेक्षाही आयुष्यातल्या विद्यापीठात जी डिग्री मिळवतो ते खूप महत्त्वाचे असल्याचे मत सत्कारमूर्ती डॉ प्रतिभा पाटील यांनी केले.
श्री सिध्देश्वर फौंडेशनच्या उपाध्यक्षा प्रिया बसवंती यांनी ८ मार्च महिला दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन अस्मिता गायकवाड यांनी केले तर आभार प्रिया बसवंती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो विशाल कल्याणी. सचिन शिवशक्ती सुनील बिद्री, रोहन नागमोती यांनी परिश्रम घेतले.
या महिला शक्ती चा झाला सन्मान
डॉ प्रतिभा पाटील ,संचालक शोभा नर्सिंग होम, , सोनाली घोंगडे आहारतज्ञ, प्रा रेश्मा माने पर्यावरण प्रेमी, वर्षा विभूते सचिव नागेश करजगी ओरचिड कॉलेज, श्रीदेवी फुलारी नगरसेविका,प्रा रजनी दळवी राष्ट्रीय हॉली बॉल खेळाडु, सुनंदा महाराना ब्युटीशियन श्वेता हुल्ले निवेदिका,योग शिक्षिका अनिता कोडमुर यांचा सन्मान करण्यात आला.