• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आजपासून राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2021
in मुख्य बातमी
0
आजपासून राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली
0
SHARES
0
VIEWS

तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील जनतेला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळून आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज पहाटेच राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरांची दारं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथील रेणुका देवी मंदिर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे.पहाटेपासूनच माहूर गडावर मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केलीय.मंदिर प्रशासनाकडून भक्तांना विना मास्क परवानगी दिली जात नसून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नवरात्री निमित्त मंदिर आणि परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाचा गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत .

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत.दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.राज्य सरकारने अटी शर्ती देऊन मंदिर खुली करण्यास परवानगी दिली मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

Previous Post

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अर्ज करा

Next Post

विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची आरास

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची आरास

विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची आरास

ताज्या बातम्या

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026