• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट, महाविकास आघाडीमुळे नुकसान

Yes News Marathi by Yes News Marathi
August 27, 2021
in इतर घडामोडी
0
महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट, महाविकास आघाडीमुळे नुकसान
0
SHARES
0
VIEWS

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर टीका
 
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचा आदेश दिल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे जबरदस्त नुकसान झाले आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी केली.
 
महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या आगामी काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय या सरकारच्या ढिलाईवरून येतो, असेही त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अठरा महानगरपालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे हे आरक्षण पुन्हा अंमलात आणणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात आघाडी सरकारने या विषयात चालढकल चालविली आहे तर दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण पुन्हा लागू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी ओबीसी समाज राजकीय आरक्षणपासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.
 
त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात आयोगामार्फत ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने संपूर्ण मदत केली तर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ही माहिती काही महिन्यात गोळा होऊ शकते आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आयोगाला मदत करत नाही. राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आणि आता त्यांच्याच ढिलाईमुळे ते पुन्हा मिळत नाही.
 
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निकालात ओबीसींची जनगणना नव्हे तर सर्वेक्षणाच्या आधारे गोळा केलेला एंपिरिकल डेटा मागितला आहे. जनगणनेचे काम क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. एंपिरिकल डेटा गोळा करणे हे कमी वेळाचे काम आहे. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने लगेच काम सुरू केले असते तरी आतापर्यंत ते बरेचसे पूर्ण झाले असते. तरीही महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या जनगणनेवर अडून बसले आहे आणि विनाकारण हा प्रश्न गुंतागुंतीचा करत आहे. आता तर राज्य सरकारने या विषयात सर्वोच्च न्यायालयात याचिका करून आणखी गुंतागुंत करून ठेवली आहे.

Previous Post

स्वप्ना म्हेत्रेची आसाम रायफल्स साठी निवड…

Next Post

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा बालेकिल्ल्यात सुरु

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा  बालेकिल्ल्यात  सुरु

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा बालेकिल्ल्यात सुरु

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026