• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सीमाभागातील मराठी बांधवांवर होणारा अन्याय थांबवा

by Yes News Marathi
August 11, 2021
in इतर घडामोडी
0
सीमाभागातील मराठी बांधवांवर होणारा अन्याय थांबवा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
पुणे: सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्यानं अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्या,’ अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. अजित पवार यांनी मराठी भाषेत हे पत्र लिहिलं आहे.

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत. संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासीयाचं स्वप्न आहे. हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढ निर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे, असे अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडं विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्यानं मी सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहे. आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी,’ अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.

Previous Post

लोकसभा मुदतीआधीच अनिश्चित काळासाठी स्थगित

Next Post

पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

Next Post

पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group