येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील आठ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून १२५ लोकांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ७६ पुरुष आणि ४९ महिला आहेत. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात शहरातील नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. प्रभाग निहाय कोरोनाबाधित व्यक्तींच्या विचार केला तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये १६, २४ मध्ये १७,प्रभाग २६ मध्ये १२ आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये नवीन १० व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली आहे. रुग्णालयातून कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या २४ तासांमध्ये १५४ आहे.