१८ जणांचा मृत्यू । ३८३ व्यक्ती घरी परतल्याने दिलासा
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा covid-19 चा ५ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने १६३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे ओढवला आहे. याच कालावधीत ३८३ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये तीस व्यक्तींना नव्याने कोरोना झाला असून प्रभाग क्रमांक २३ मध्ये १७ , प्रभाग क्रमांक २१ मध्ये ११ आणि प्रभाग क्रमांक २६ मध्ये २१ व्यक्तींना नव्याने कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.