सोलापूर : विजापूर रस्त्यावरील सिद्धिविनायक सोसायटीत राहणाऱ्या विजयालक्ष्मी बिराजदार यांनी 50 हजार रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार प्रवासात चोरीस गेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. विजयालक्ष्मी बिराजदार या सिंदगी ते सोलापूर या एसटी बसमधून सोलापूरकडे निघाल्या असताना वाटेत ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विजयालक्ष्मी या बॅग हातात घेऊन सोबत मुलीला घेऊन उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन टाकळी येथे बसमध्ये चढलेल्या पाच महिलांनी बॅगेतील ऐवज चोरून नेल्याचे विजयालक्ष्मी यांनी म्हटले आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.