येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 391 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज रविवारी दि.28 मार्च रोजी ग्रामीण भागातील 391 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 236 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 144 आहे. यामध्ये पुरुष 96 तर 48 महिलांचा समावेश होतो. आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 5178 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4787 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.