येस न्युज मराठी नेटवर्क ; कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे सोलापूर शहरातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.सोलापूर शहरात दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहतील. त्याच प्रमाणे शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद राहतील . परंतु दूध भाजीपाला किराणा आणि जीवनावश्यक वस्तू तसेच वृत्तपत्र वितरण शनिवारी व रविवारी देखील चालू राहील , असा आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आहे.