येस न्युज मराठी नेटवर्क । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात अजून दोन लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील एक कार रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर आहे. तर दुसरं वाहन मर्सिडीज बेन्झ आहे.
यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता.