येस न्युज मराठी नेटवर्क : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारला बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलीच चपराक दिलीय. २०१६ साली मोदी सरकारनं कोणत्याही विचार-विनिमयाशिवाय घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बरोजगारी सर्वोच्च स्तरावर आहे, असं डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे. राज्यांशी नियमित रुपात कोणताही विचार-विनिमय न करता निर्णय घेण्यावरूनही मनमोहन सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.आर्थिक विषयांसंबंधित ‘थिंक टँक’ राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट स्डडिजद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विकास परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी डॉ. मनमोहन सिंह उपस्थित होते.