शिवाजी सुरवसे : सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने 12 जानेवारी 2021 पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार पगार अदा करावा असा आदेश काढला आहे. सातवा वेतन आयोग वेतन श्रेणी 2016 पासून लागू करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष वेतन या महिन्यापासून देण्यात करण्यात येणार आहे चार वर्षातील फरकाची रक्कम महापालिकेने आपल्या स्तरावर विचार करून द्यावी असे देखील आदेशात म्हटले आहे.
त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव पसरला आहे काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेमध्ये हलग्या वाजवून तसेच नगरसेवक गणेश वानकर यांचा सत्कार करून महापालिका आयुक्तांचे आभार मानले तर दुसरीकडे महापालिकेत ठिय्या आंदोलन करत आरोग्य अधिकाऱ्यांसमोर गार्हाणे मांडले. सातवा वेतन आयोग लागू करताना महापालिकेतील कर वसुली 100% करावी मनपाने भाड्याने दिलेल्या जागां चा 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी तसेच पाणीपट्टी 100 टक्के वसुली बारावी आणि मनपाचे उत्पन्न वाढेल आणि खर्च 35% च्या आत राहील अशा अटी शासनाने घातल्या आहेत