दिलीप मानेंचा शेकडो शेतकऱ्यांना घेऊन महावितरण कार्यालयात ‘ठिय्या’

0
150

सोलापूर : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकित बिलापोटी ट्रान्सफार्मर बंद केले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल भरले जात नाही तोपर्यंत ट्रान्सफॉर्मर सुरू केले जाणार नाहीत अशी भूमिका महावितरण कंपनीने घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समोर मोठ्या अडचणी निर्माण झाले आहेत वीज नसल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही अशा परिस्थिती मध्ये शेतकरी अडकला आहे.याच पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला.

यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. दिलीप माने आणि अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. पाच एचपीच्या मोटरसाठी पाच हजार रुपये आणि त्यापुढील एचपी मोटर साठी सात हजार रुपये भरावे त्यानंतरच ट्रान्सफर सुरू होतील असे अधीक्षक अभियंता सांगळे यांनी सांगितले. मात्र शेतकर्‍यांमधून 5 एचपी साठी तीन हजार रुपये भरण्याची मागणी पुढे आली. महावितरणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे ठरले.

यावेळी सभापती रजनी भडकुंबे, निखिल देशपांडे, प्रथमेश पाटील, गंगाधन बिराजदार, शकील कोंडले, चंद्रकांत खूपसंगे,चंद्रकांत कुलकर्णी, हन्नूरसिद्ध शेजाळ,सद्दाम शेख, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, अॅड. अजित पाटील, उमेश भगत, शिवाजी एलगुंडे, अशपाक मुल्ला,सागर माने,बंटी माने, सरपंच नेताजी सुरवसे, गोंविद राठोड, राम गायकवाड, रेवणसिद्ध साखरे, बाबासाहेब पाटील, सचिन गुंड, अनिल पाटील, रेवनसिद्ध पुजारी, संभाजी पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.