रोटरी अन्नपूर्णा योजनेचा १५वा वर्धापन दिन साजरा

0
16

येस न्युज मराठी नेटवर्क ;  रोटरी अन्नपूर्णा योजनाद्वारे रोटरी क्लब ऑफ  सोलापूरने १०० वृध्दांना दिला  आहे आधार आणि  हे कार्य खरंच वाखाण्याजोगं असून रोटरीच्या सामाजीक सेवेच्या बांधीलकीचे प्रतीक असल्याचे प्रतीपादन उपआयुक्त बापू बांगर यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ सोलापूरद्वारा गत १५ वर्षापासून सुरु असलेल्या रोटरी अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी  शुभराय मठ येथे आयोजीत १५ वर्षे पूर्ती  सोहळ्याप्रसंगी बोलत होते. एखादी योजना १५ वर्षे अखंडीतपणे सुरु राखण्याचे रोटरी क्लब ऑफ  सोलापूरचे हे कार्य खरेच कौतुकास्पद असल्याचा एसीपी बापू बांगर गौरवोद्गार यांनी काढले. याप्रसंगी त्यांनी स्वतः एका व्यक्तीचे डब्बाचा खर्चाचे पैसे अध्यक्षांकडे सुपूर्द केले.


प्रारंभी अध्यक्ष कालीदास जाजू यांनी प्रास्ताविक केले तर योजनेचे चेअरमन राज मिनियर व जयेश पटेल यांनी रोटरी अन्नपूर्णा योजनेचा आढावा दिला. ही योजना उद्योगवर्धीर्नीच्या बचत गट तसेच रिक्षाचालक शरणय्या हिरेमठ यांच्या दैनंदिन उत्सुर्फत सहभागामुळेच गेली १५ वर्षे अविरत एकही दीवसाचा खंड न पडता चालू असल्याचा त्यांनी आवूर्जन उल्लेख केला. आजतागायत सुमारे 5,47,500 डब्बे देण्यात आले असून जवळपास 1 कोटी पंचावन लाख इतका खर्च झाले असल्याचे सांगण्यात आले.या योजनेला दानशूर व्यक्तिंच्या आर्थिक सहयोग  प्रति वर्ष मिळत  असल्यानेच ह्या योजनेने आज सोलापूरात नव्हे तर भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.  रुपए आठ  हजार एकशे देणगी दिल्यास एका व्यक्तिचे  वर्षभरासाठी एक डब्ब्याचे पालकत्व सद्या देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. इच्छुकांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या सदस्यांशी अवश्य संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आजचा संपूर्ण खर्च राजगोपाल मिणियार यांनी पुरस्कृत केला होता.


            रोटरी क्लबचे सचिव सुरज तापडिया यांनी आभार प्रदर्शन केले.याप्रसंगी भरत अयंगर,खुशाल देढीया, सलाम शेख, .शांता येलंमकर, विशाल वर्मा, जयेश पटेल, वसीम पटेल,केदार कहाते,पराग कुलकर्णी आदी उपस्थित  होते.