अक्कलकोट आयटीआय प्रशिक्षण संस्थेत 140 जागा

0
118

सोलापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अक्कलकोट या संस्थेत प्रवेश देणे सुरु आहे. वेल्डर, ड्रेसमेकींग, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, फिटर वीजतंत्री आणि यंत्रकारागीर या व्यवसायासाठी एकूण 140 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याने प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम.एस. उडानशिवे यांनी केले आहे.

            शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी शासनाने प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरु केलेली आहे. यासाठी WWW.ADMISSION.DVET.GOV.IN या संकेतस्थळाला भेट देवून स्टुडंट रेजिस्ट्रेशन या पर्यायाद्वारे ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांनी शैक्षणिक अर्हतेनुसार अचूक माहिती भरावी. संस्थेत उपलब्ध असलेल्या व्यवसायाचा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 20 जून 2022 पासून सुरु झालेली आहे. प्रत्यक्ष प्रवेशाचे फेरनिहाय वेळापत्रक संस्थेत / ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे प्रवेश घ्यावेत, असे आवाहन उडानशिवे यांनी केले आहे.