• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंगळवारपासून स्वेरी कॉलेजमध्ये रंगणार युवा महोत्सव!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2023
in मुख्य बातमी
0
मंगळवारपासून स्वेरी कॉलेजमध्ये रंगणार युवा महोत्सव!
0
SHARES
0
VIEWS
  • 60 महाविद्यालये, 1600 विद्यार्थी कलावंतांचा सहभाग
  • सोलापूर विद्यापीठाकडून कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19 वा युवा महोत्सव पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे होणार असून मंगळवार, दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सकाळी दहा वाजता सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील. दि. 10 ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण 39  कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे 60 महाविद्यालये आणि जवळपास 1600 विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, भजन, प्रश्नमंजुषा (लेखी), मराठी-हिंदी-इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, भारुड, काव्यवाचन, भित्तीचित्रण, मेहंदी, लावणी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. बुधवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पोवाडा, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, लोक वाद्यवृंद, जलसा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील. गुरुवार दि. 12 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, प्रहसन, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे आणि युवा अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील तर कुलसचिव योगिनी घारे आणि वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पत्रकार परिषदेस कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.

वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख
यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. महाविद्यालयाचे संस्थापक व सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

अजित पवार गटासोबत असणारे ४२ वे आमदार नवाब मलिक?

Next Post

कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात; दोन भारतीय शिकाऊ पायलटचा मृत्यू

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात; दोन भारतीय शिकाऊ पायलटचा मृत्यू

कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात; दोन भारतीय शिकाऊ पायलटचा मृत्यू

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026