सोलापूर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर युवक काँग्रेसतर्फे ५ ते १३ डिसेंबर या काळात युवा प्रेरणा सप्ताह राबविला जाणार आहे.
रक्तदान शिबिरे, चादरी वाटप, आरोग्य शिबिरे, गरिबांना जेवण, स्वेटर, साड्या, प्रणिती नाव असलेल्यांना एक लिटर पेट्रोल मोफत, अंधमूकबधिरांना ड्रेस व खाऊवाटप, ९ डिसेंबरला जन्मणाऱ्या मुलींना बेबी किट, कर्तृत्ववान व्यक्तींना युवा प्रेरणा पुरस्कार, बेघर निवारा केंद्रात जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप, शिलाई मशिन वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. ५ डिसेंबरला काँग्रेस नेत्या उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार असल्याची माहिती युवकचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.