दिल्ली येथे ISAP या संस्थेने तीन राज्यातील महाराष्ट्र,छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील एकूण 30 महिला उद्योजकांना आमंत्रित केलेले असून दिल्ली येथील साकेत या हॉटेलमध्ये “डेमो डे” women ENTREPRENEURS SHOWCASING BUSINESS MODELS AND ENTERPRISES हा प्रोग्राम घेण्यात आला.
या कार्यक्रमाकारिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्चना सिंग (Policy Specialist,G20 Secretariat ministery of women & child development), रेणूजी शहा, (नीती आयोग), कमल खुराणा (ICAP CEO), अनस खान, शोविक धार, दिव्या राय, गौरव वशिष्ठ, ऋतुजा पाटील ,जितेंद्र शर्मा व योगेश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
दिल्ली येथील कार्यक्रमामध्ये सादरीकरण करताना उत्कृष्ट उद्योजक म्हणून महाराष्ट्र राज्यातील यशस्विनीने मैदान गाजवले. 1) शिलाताई बरोळे (तांदूळवाडी द.सोलापूर यशस्विनी कंपनी सभासद) यांनी भाजीपाला, गुलाब व गुलाबजल या उद्योग या विषयी सादरीकरण केले 2) सुवर्णा मुडके यांनी बटाटा वेफर्स व सेंद्रिय भाजीपाला या उद्योगाचे सादरीकरण केले 3) लताताई पांडव यांनी पाभर कंपनीच्या माध्यमातून पापड, कुरुडे, ज्वारीचे पापड व नाचणी पापड याची सादरीकरण केले 4) राजश्री येनगुरे यांनी काळा मसाला व शेंगा चटणी याची सादरीकरण केले. 5) ज्योती राठोड यांनी काळा मसाला व बंजारा ज्वेलरी याचे सादरीकरण केले. 6) पूजा झुरळे यांनी कडक भाकरी व शेंगा चटणी याचे सादरीकरण केले. 7) अनिता खेडे यांनी सेंद्रिय द्राक्ष व ज्वारीचे फ्लेवर शेवया यांचे सादरीकरण केले. 8) राधा चेंडके यांनी गावरान कोंबडी व शेळी व्यवसाय यांचे सादरीकरण केले 9) सीमा बनसोडे यांनी शेंगा लाडू व ज्वारीचे चकली यांचे सादरीकरण केले 10) महानंदा शिंदे यांनी ज्वारी व ज्वारीचे पदार्थ व भाजीपाला यांचे सादरीकरण केले. 11) अनिता माळगे यांनी यशस्विनी कंपनी मार्फत मिलेटमध्ये ज्वारीचे बिस्कीट, केक, लाडू,शेवया, सांडगे, भाकरी व शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध योजना कंपनी मार्फत राबवित असलेले माहिती सखोल पद्धतीने सादरीकरण केले व ISAP मार्फत महिला उद्योजकांना प्रमाणपत्र व सत्कार करण्यात आले.