शुक्रवार दि.3/11/2023 रोजी फौजदार चावङी पोलिस ठाणे हद्दीत राजू कोंङीबा बंङगर रा.शनि मंदीर रेल्वे काॕलनी सोलापूर यांचा अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने सावजी हाॕटेलच्या बाजूला इंदिरा गांदधी स्टेङिअम समोर अज्ञात व्यक्तीने खून केला होता . याबाबत फौजदार पोलिसांकडून या घटनेचे सूत्र वेगाने फिरले आणि तपासा दरम्यान खून कोणी केला? याचा शोध लागलाच .फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील आरोपीचा शोध घेतला असता संबंधित आरोपी सिद्धेश्वर मंदीर परिसर या ठिकाणी लपून बसल्याबाबत गुप्त माहिती मिळाली तात्काळ फौजादार चावङी पोलिसांनी घटनास्थळी धावून यातील आरोपी ज्योतिबा तानाजी केते वय ३६ वर्षे रा.प्लाॕट नं.सी ४४१ जाई जुई नगर जुळे सोलापूर याच्या मुसक्या आवळून सहा तासाच्या आत फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली .आरोपीला मे.न्यायालयात हजर केले असता मे.न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठङीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.आरोपी हे मनोविकृत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग १ ङाॕ.संतोष गायकवाड यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली.
ही दमदार कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशाखाली पोलिस उपायुक्त परिमंङळ ङाॕ,विजय कबाङे ,सहाय्यक पोलिस आयुक्त ङाॕ.संतोष गायकवाड ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद,पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच फौजदार चावङी पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुङे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी अजय पाङवी,प्रविण चुंगे,दत्ता कोळवले,नितिन जाधव ,विनोद व्हटकर ,सुधाकर माने ,नितिन मोरे ,सचिनकुमार लवटे,पंकज घाङगे,कृष्णांत बङुरे,अजय चव्हाण
अमोल खरटमल ,विनोद पुजारी ,शशिकांत दराङे ,नागनाथ घुळवे यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले.