सायकल लवर्स सोलापूर यांचा उपक्रम
जगभर 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असताना सायकल लवर्स सोलापूर या सोलापुरातील सायकल प्रेमी ग्रुप कडून सोलापूर शहरांमधून 24 किलोमीटरची सायकल रॅली करून नवीन वर्षाची पहिली सकाळ वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी त्यासाठी सायकलिंगचा अधिकाधिक वापर करावा या उद्देशाने नवीन वर्षाचे स्वागत आरोग्यदायी व आनंददायी पद्धतीने करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शारदा प्रतिष्ठान, संचलित सायकल लवर्स ,सोलापूर या ग्रुपकडून वर्षभर विविध सायकल राईड, निसर्ग भ्रमंती, तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळांना भेटी, चर्चासत्रे, सायकल बँक आदी उपक्रम राबवले जातात. याशिवाय दरवर्षी "सी एल एस सोलापूर सायक्लोथोन" ही मोठी सायकलिंग स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदा 28 जानेवारी 2024 रोजी रविवारी सकाळी सहा वाजता लक्ष्मी तरु गार्डन बाळे येथे या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सीएलएस चे समन्वयक डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी सांगितले. सोलापूरतील सायकल प्रेमीनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सायकल लवर्स सोलापूर ग्रुप कडून करण्यात आले आहे.
“नवीन वर्षात आपण नवीन संकल्प करत असतो. सध्याच्या युगामध्ये कामाच्या तणावातून थोडा वेळ काढून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 24 किलोमीटर सायकलिंग करून 2024 चे हेल्दी स्वागत केले आहे. “
डॉक्टर रूपाली जोशी नेत्ररोगतज्ञ ,महिला समन्वयक,सी एल एस सोलापूर.