२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रकने चिरडल्यामुळे अपघाती मृत्यू, कुटुंबावर शोककळा

0
25

प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा अपघाती मृत्यू झाला आहे. बंगालच्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुप्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसंच या अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंगवरुन परतत होती. घरी परतण्यासाठी तिने एका APP वरुन बाईक बुक केली होती. रस्त्यात एक सायकल स्वार रस्ता ओलांडत होता. तो या अभिनेत्रीच्या रस्त्यात आला. त्यावेळी सुचंद्राने ब्रेक मारला. त्यावेळी एका ट्रकने या अभिनेत्रीला धडक दिली. त्यामुळे सुचंद्रा खाली पडली. त्यामागून आलेल्या ट्रकने तिला चिरडलं. ही धडक इतकी जबरदस्त होती की अभिनेत्री सुचंद्राचा जागीच मृ्त्यू झाला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसंच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली होती.