श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व महिला ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर : ट्रक चालक व मदतनीस क्लिनर हे परराज्यातून परगावी आल्याने त्यांच्या बहिणीकडून राखी बांधण्यास त्यांना अडचण येते. त्यांनाही रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करता यावा म्हणून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापुरात एका ट्रान्सपोर्टमध्ये चालकांना, क्लिनर यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
गेल्या पाच वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उपक्रम घेऊन संस्कृती व परंपरा जोपासली जात आहे. यापूर्वी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने सोलापूर एस.टी.स्टँडमधील वाहक – चालक, रेल्वे स्टेशनमधील टी.सी तसेच पोस्टमन काकांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. यावर्षी हैदराबाद रोडवरील साईनाथ ट्रान्सपोर्ट येथे ट्रक चालकांना व क्लिनर यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम उपक्रम घेण्यात आला. ट्रक चालक व मदतनीस क्लिनर जे परराज्यातून येतात. ते परगावी असल्याने राखी बांधण्यास अडचण येते म्हणून येथील ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक चालकांना व क्लिनर यांना श्रीमंतयोगी च्या महिला ग्रुपने राख्या बांधल्या. औक्षण केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश कासट, प्रकाश पाटील, आकाश लखोटिया, निशांत वाघमारे, मल्लिकार्जुन यणपे, सुरेश लकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

ट्रक चालक, क्लिनर यांनी व्यक्त केले समाधान
सगळ्या ट्रान्सपोर्ट मधील आम्हीं ट्रक चालक , क्लिनर खुप नशीबवान आहोत. बऱ्याच वेळा परगावी असल्याने आम्हाला रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही. मात्र श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भगिनींनी राखी बांधून दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिला. आम्ही कुठेही असलो तरी हा क्षण आठवणीत राहील.खूप आनंद व समाधान वाटले ,अशी भावना ट्रक चालक, क्लिनर व इतर कामगारांनी व्यक्त केली.
या भगिनींनी बांधल्या राख्या
अक्षता कासट, प्रियंका जाधव, रुपा कुत्ताते, प्राजक्ता जाजू, सुजाता सक्करगी, भाग्यश्री वंजारे, माधुरी चव्हाण, रुचा चव्हाण, शुभांगी लचके, शिला तापडीया, अर्चना बंडगर, शिल्पा अलमेलकर, आरती बंडगर या भगिनींनी ट्रक चालक व क्लिनर यांना राखी बांधली.