No Result
View All Result
- सोलापूर : “पाणी द्या पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा !” यासह विविध घोषणा देत महापालिका आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून लक्ष वेधण्यात आले. भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी आज दुपारी ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तास घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, अधिकारी फिरकले नसल्याचे दिसून आले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे आल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
- गेल्या अनेक दिवसापासून शहरात 4 दिवसाआड पाणीपुरवठा तर हद्दवाढ भागात 6 ते 7 दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा पूर्वरत करावे. काही भागात गढूळ, दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या भागात स्वच्छ पाणी सोडण्यात यावे आणि काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसह नागरिकांनी महापालिका कौन्सिल हॉल समोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. “पाणी द्या पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा” यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
- दरम्यान, माठही फोडण्यात आले. त्यानंतर अधिकारी फिरकले नसल्याने अखेर आंदोलकांनी आपला मोर्चा थेट आयुक्त कार्यालय समोर नेला. आयुक्त कार्यालय समोर ही बराच वेळ घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणीही माठ फोडण्यात आले. अखेर दीड वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे महापालिकेत आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर सर्व आंदोलन त्यांच्या कार्यालयाकडे गेले. यावेळी अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी माजी नगरसेवक पाटील व शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.
- शेळगी परिसरात पाणी मिळते तर मग भवानी पेठेत का नाही ?
आमदार, खासदार व आयुक्तांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच शेळगी परिसरात पाणी मिळते तर मग भवानी पेठेत का नाही ? आमदार विधानसभेत हा प्रश्न का मांडत नाहीत, असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
- दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत !
जलवाहिनी कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना दिली.
No Result
View All Result