अमेरिका आणि इजराइलने इराण वर हल्ला केला. एवढेच नव्हे तर पहिल्यांदाच एकाच वेळी आठ देशावर हल्ले करण्यात आले.यामुळे तेल उत्पादक अशा आखातामध्ये युद्ध पेटले आहे. शिवाय भारताचा शेजारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे. भारत सुमारे 85% तेल आयात करतो. ज्या मध्यपूर्व म्हणजेच मिडल ईस्ट मध्ये युद्ध सुरू आहे तेथून सुमारे 50 टक्के कच्चे तेल भारत आयात करतो. त्यामुळे युद्ध बराच वेळ चालले तर भारतील तेलाचे दर भडकणार असून महागाई देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. इराण,इजराइल, कतार, बहरीन, सौदी,अरेबिया, बहरीन अशा युद्धाच्या सावटाखाली असलेल्या अरब देशामध्ये सुमारे 97 लाखाहून अधिक भारतीय आहेत. एवढेच नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक अबुधाबी आणि दुबई या ठिकाणी जातात, तिथे देखील बॉम्ब हल्ले झाले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळा हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटन व्यवसायावर परिणाम होणार आहे. भारताने या देशाकडे जाणारी सर्व विमाने रद्द केली आहे एकूणच जग युद्धाच्या उंबरठ्यावर असून याचा फटका महागाईचा रूपाने सर्वसामान्य पर्यंत पोहोचणार आहे.

