• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2026
in Blog
0
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!
0
SHARES
1
VIEWS

हलते आकर्षक देखावे, नृत्याविष्काराने मार्कंडेय रथोत्सवात रंगत

सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय रथोत्सवात डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात तरुणाई थिरकली. विविध पारंपारिक खेळ, नृत्याविष्कार तसेच हलत्या देखाव्यांनी मिरवणुकीत रंगत आणली.

पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त शुक्रवारी पूर्व भागात भव्य रथोत्सव मिरवणूक मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. डॉल्बी,ढोल-ताशांचा दणदणाट, पौराणिक, धार्मिक,,सांस्कृतिक देखावे, लेझीमचा ताल, विविध धार्मिक व सांस्कृतिक देखावे, ढोल, लेझीमचा बहारदार खेळ, शक्ती प्रयोगाचे थरारक खेळ पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत सुमारास दत्तनगर, पद्मशाली चौक, पोलिस हेडक्वार्टर रोड परिसरात अलोट गर्दी झाली होती. भक्ती, शक्ती, सळसळता अमाप उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिलांनी लेझीमचा तसेच सूर्योदय मंडळाने ढोलचा बहारदार खेळ सादर केला.

रथोत्सव मिरवणुकीत एका वाहनावर उमा कारमपुरी व बालमणी पूलूर या चरख्यावर सूत कातत होत्या तर अंबादास करली व लक्ष्मण गणपा यांनी सूतापासून हातमागावर भगवान मार्कंडेयांसाठी महावस्त्र विणत होते.

रथोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकतेचा याचा सुंदर संगम पाहायला मिळाला. ढोल-ताशे, लेझीम, चित्त थरारक कसरती, हलते देखावे आणि श्री मार्कंडेय महामुनींच्या जयघोषाने सारा पूर्व भाग परिसर अक्षरशः दुमदुमून गेल्याचे चित्र दिसून आले.

‘श्री ओम साई प्रतिष्ठान’च्यावतीने साकारण्यात आलेला राजस्थानमधील प्रसिद्ध श्री खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा मिरवणुकीचे आणखी एक आकर्षण ठरले. ‘हारे का सहारा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खाटूश्यामजींच्या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

या मिरवणुकीत घोंगडे वस्ती प्रतिष्ठान, जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, जे.पी. कंपनी, जे. एम. संघटना, आर्या टू डान्स ग्रुप, कर्ण साम्राज्य, एमटीएम बॉईज, बजरंग सेना, माधवनगर लेझीम संघ, जय मार्कंडेय सामाजिक संस्था मित्र मंडळ, जय मार्कंडे बहुउद्देशीय संस्था, न्यू सुनीलनगर मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ आदी मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होता.

मंदिरापासून रथ मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यावर विजापूर वेस, भारतीय चौक भवानी मंदिर ,रत्न मारुती मंदिर रोड, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, आंध्र दत्त चौक, मार्कंडेय सोलापूर रुग्णालय, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, भुलाबाई चौक, नेताजीनगर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे रात्री उशिरा मार्कंडेय मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.

प्रथमच महिलांचे लेझीम पथक

यंदाच्या रथोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते महिला लेझीम पथकाचे. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच महिलांच्या लेझीम पथकाने रथोत्सवात सादरीकरण करून लेझीमचा बहारदार डाव सादर करून लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी लेझीमच्या तालावर केलेल्या विविध खेळांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याशिवाय मिरवणुकीत अनेक कसरतींचे खेळ सादर करण्यात आले. याशिवाय काही तरुणींनी सूर्योदय मंडळाच्या ढोल पथकामध्ये सहभाग नोंदवला.

Previous Post

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026