No Result
View All Result
- नवी दिल्ली : देशातील पाच बड्या घराण्यांमुळं जनतेला महागाईचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केला आहे. यासाठी त्यांनी उपायही सुचवला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे.
- आचार्य यांनी म्हटलं की, रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, अदाणी ग्रुप तसेच भारती टेलिकॉम या पाच बड्या घराण्यांच्या कंपन्यांमुळं छोट्या कंपन्यांचा नुकसान होत आहे. रिटेल रिसोर्सेस आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये या कंपन्यांना किंमती ठरवण्याची ताकद आहे. महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा देखील हात आहे. यासाठी या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे.
- ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सन २०१७ पासून २०१९ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर असलेले विरल आचार्य यांनी म्हटलं की, सरकारच्या मोठ्या टेरिफनुसार देशातील बड्या कंपन्यांना संरक्षण मिळतं. तसेच विदेशी कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत. देशातील महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा मोठा हात आहे. स्पर्धा वाढवण्यासाठी आणि प्राईसिंग पावर कमी करण्यासाठी या पाच बड्या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे. आचार्य हे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर राहिले आहेत.
- आचार्य यांनी एका पेपरमध्ये म्हटलं की, कच्च्या मालाच्या किंमतीत घट झाल्याचा पूर्ण फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार नाही, कारण पाच बड्या कंपन्या मेटल, कोक, रिफाइंड पेट्रोलिअम प्रॉडक्स्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसह रिटेल ट्रेड आणि टेलिकम्युनिकेशन्सला नियंत्रित करते. सप्लाय चेनमधील अडचणी दूर झाल्यानं जगभरातील महागाई कमी झालेली असतानाही भारतात अद्यापही महागाई कायम आहे.
- आचार्य यांनी जून २०१९ मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सहा महिने आधी आरबीआयमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पॉलिसी रेटच्या अनेक निर्णयांमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याविरोधात मत दिलं होतं.
No Result
View All Result