नोकर भरती प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही; प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होणार- झेड पी सी ई ओ तृप्ती धोडमिसे

0
29

सांगली (सुधीर गोखले) – जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवली जात असून संपूर्ण प्रक्रिया हि संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने पूर्णपणे पारदर्शी राबवली जात असून सांगली जिल्हा परिषदेमधील ७७४ जागांसाठी नोकर भरती होत असून यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे तसेच उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि आपली फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेच्या सी इ ओ तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या’ हि नोकर भरती प्रक्रिया आय बी पी एस या कंपनी मार्फत होणार असून त्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा उमेदवारांना ऑनलाईन द्यावी लागणार आहे या नोकर भरती साठी २५ ऑगस्ट हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करून घ्यावी अर्ज करताना काही अडचणी असल्यास जिल्हा परिषदेमध्ये हेल्प डेस्क सुरु केल्याचे हि त्यांनी सांगितले.

या भरती मध्ये आरोग्य विभागाच्या शंभर टक्के जागा भरल्या जाणार असून अन्य ऐशी टक्के जागा भरल्या जातील सांगली जिल्हा परिषद मध्ये एकूण ८५० जागा रिक्त असून त्यापैकी ७५४ जागा सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यावेळी उपस्थित होते.