प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण
सोलापूर- मी आतापर्यंत अनेक शिखरावरती चढाई केली आहे. अशा प्रकारची चढाई करत असताना मला माझे मित्र विचारायचे की तुला भीती वाटत नाही का तर त्यांच्या प्रश्नाचं माझ्याकडे सोपं उत्तर होतं मला जर दिसलं तर त्याची भीती वाटेल आणि मला तर दिसतच नाही मग भीती कसली. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने दृष्टिकोन बदलला तर दृष्टीची आवश्यकता लागत नाही. अंदाजे मी अपंग आहे म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहता प्रत्येकाने काम शोधण्यापेक्षा काम देणारे हात निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पदक प्राप्त अंध उद्योजक भावेश भाटिया यांनी व्यक्त केले .
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रिसिजनगप्पाच्या या दुसऱ्या दिवशी उद्योजक भाटिया हे बोलत होते.
प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या वितरण प्रसंगी मुलाखतकार अनघा मोडक यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी मीनाक्षी निकम दीक्षा दिंडे हे बोलत होते.
यावेळी चाळीसगाव,जळगाव येथील स्वयंदीप संस्थेला या वर्षीचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ( ३ लाख रुपये व सन्मानचिन्ह ) तसेच दिव्यांग दीक्षा दिंडे यांना “स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. ( दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह ) रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. भावेश भाटिया यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा व संचालक रवींद्र जोशी हे उपस्थित होते.
माझ्या जीवनामध्ये प्रथमतः आईने मला जीवन सोबती म्हणून वाढवले . माझ्या जगण्यामध्ये आईची मदत मोठी होती. अडचणी खूप आल्या त्या अडचणीवर मार्ग काढण्याचं बळ ही आईकडूनच मिळालं. अपंग माणसाला समाज लवकर स्वीकारत नाही .जेव्हा अपंगाच्या आतून एखादं चांगलं कर्तृत्व घडतं .तेव्हा हाच समाज सत्कारासाठी पुढे येतो. तेव्हा मात्र मन भरून येत असल्याच्या भावनाही भावेश भाटिया यांनी व्यक्त केल्या.
यावेळी स्वयंमदीप संस्थेच्या मीनाक्षी कदम म्हणाल्या की, शेतामध्ये बसलेली असताना मला साप दिसला. त्या सापापासून मला प्रेरणा मिळाली की हा साप हात नाही, पाय नाही ,तरीही चपळाईने सळसळ करत आपले जीवन जगतो .मग मी पण त्या पद्धतीने का जगू शकत नाही ? हा विचार मनात आल्याने त्यामधून प्रेरणा घेऊन मी माझ्या आयुष्याची वाटचाल सुरू केली. आज राज फॅशन डिझाईनच्या माध्यमातून विधवा ,अपंग, गरजू स्त्रियांना मोफत शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचं बळ दिलं आहे याचं समाधान वाटतं.
अनेक शाळांनी नकार दिला होता
दीक्षा दिंडेला सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रासले होते. नंतर सहकाऱ्यांच्या मदतीने सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरु केली. दिव्यांग किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी अशा विविध विषयांवर अनेक संस्थांसोबत काम करणारी दिक्षा म्हणाली की, मी सगळीकडे नकार पचविले होते. त्यात मैत्रीत, शाळेत , कॉलेज मध्येही नकार मिळाला. पण पहिल्यांदा शिष्यवृत्ती मिळाल्यावर मला परदेशात तुला दिव्यांग सुविधा मिळत नसतील तर ती आमची समस्यां आहे तुमची नाही.हे ऐकायला मिळाले. ते ऐकून आपल्या डोळयांत पाणी आले. असे दिक्षा म्हणाली यावेळी सभागृह टाळ्यांनी कडकडले.