No Result
View All Result
- सोलापूर येथील एका विवाहित महिलेशी सोशल मिडियातुन ओळख निर्माण करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडुन तब्बल २१७८ ग्रॅम सोने लुटुन दुष्कर्म केल्याच्या प्रकरणातील तरुणाचा जामीन सोलापूर येथील सत्र न्यायालयाने फेटाळला.
- याची थोडक्यात माहिती अशी की, श्रीधर श्रीनिवास रच्चा, (वय- ३२ वर्षे, रा. सोलापूर) या तरुणाने एका विवाहितेच्या फेसबुक अकाऊंटला २०१९ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, त्यास पिडितेने प्रतिसाद दिला नाही, तरीही आरोपीने वारंवार रिक्वेस्ट पाठवल्याने तिने ती स्विकारली, त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढुन प्रेमसंबंध निर्माण झाले, त्याचा गैरफायदा घेऊन तरुणाने काही फोटो, व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. सदर तरुणाने विवाहितेकडुन वेळोवेळी एकुण १५ लाख १४ हजार रुपये व २,१७८ ग्रॅम सोने, फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन काढुन घेतले.
- त्याबाबत पिडितेने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये सदर तरुणार तात्काळ अटक झाली. त्याबाबत सदर तरुणाने सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला होता. त्यावर मुळ फिर्यादी पिडिता यांचेतर्फे ऍड. शशि कुलकर्णी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध केला. तसेच सरकारी वकील ऍड. दत्ता पवार यांनी आरोपीने थंड डोक्याने लुटमार करण्याच्या उद्देशाने शारिरिक अत्याचार करुन कसा गुन्हा केला याबद्दल कोर्टास उपलब्ध पुराव्यावरुन पटवुन दिले. सदर बाबींचा विचार करुन सोलापूर येथील सत्र न्यायालायाने सदर तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला.
- सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे ऍड. दत्ता पवार तर मुख्य आरोपीतर्फे ऍड. संजय चव्हाण यांनी काम पहिले.
No Result
View All Result