रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय- पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे

0
31

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय असल्याचे गौरवोद्गार सोलापूर शहर पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी काढले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे भरीव प्रयत्न, शिक्षकांची प्रेरक आणि स्फूर्तीदायक कृती, संस्था चालकांची मायेची परखण – रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय – पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे.

सोलापूर-राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी काढले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे भरीव प्रयत्न, शिक्षकांची प्रेरक आणि स्फूर्तीदायक कृती ,संस्था चालकांची मायेची परखण असा त्रिवेणी संगम येथे अनुभवला. असे सत्कार्य अविरत करत राहा असा विनम्र अभिप्राय ही त्यांनी नोंदविला. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


प्रारंभी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष ऍड मल्लिकार्जुन अष्टगी यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि शाळेचे विश्वस्त राजेशजी दमाणी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तर राजेशजी दमाणी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि शाळेची माहिती मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी सांगितली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राजेश दमाणी यांनी शाळेसाठी टीव्ही संच भेट दिला. कार्यक्रमाचे आभार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मानले तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले.


या कार्यक्रमासअध्यक्ष ऍड मल्लिकार्जुन अष्टगी, शाळेचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपालजी झंवर, सहसचिव डॉ वैद्य, जान्हवी माखीजा, मुकेश मेहता, मणीकांत दंड, सुभाष जाधव, गुरुराज यल्लटी विवेक खमीतकर, रेणुका पसपुलें, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, सैपन बागवान , गंगाधर मदभावी, साहेबगौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार , आदी उपस्थित होते. असा त्रिवेणी संगम येथे अनुभवला.असे सत्कार्य अविरत करत राहा, असा विनम्र अभिप्राय ही त्यांनी नोंदविला. लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.