सोलापूर : सोलापूर झेडपी कार्यालयात समाजकल्याण विभागातून विभक्त होऊन आता दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय स्वतंत्र सुरू म झाले असून त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. तर या पदभाराची धुरा देखील समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दिव्यांग कार्यालय स्वतंत्र व्हावे यासाठी मागील चार महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. ८ देशात प्रथमच तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दिव्यांग कल्याण विभाग वेगळा करण्याचा निर्णय तत्कालीन युती सरकारने घेतला. त्यानंतर एक मे पासून राज्यातील १३ जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे स्वतंत्र कामकाज सुरू करण्यात आले.
राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची नुकतीच नियुक्ती झाली आणि उर्वरित जिल्ह्यांत जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाची निर्मिती करुन शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे निर्दे शित केले. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेत तात्पुरती कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून सुलोचना सोनवणे यांच्याकडे पदभार सोपविला.
जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब राजमाने यांच्या हस्ते युग पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मल्लिकार्जुन मळगे, संस्थाचालक शरद उकिरडे, सपना चिट्टे, चित्रसेन पाथरुट, शशीभूषण यलगुलवार, संजीव इटकर, भिम राव धोत्रे, माधव देवकर, समीर तडवळकर, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक मुठाळ, काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र कुलकर्णी प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक भिमाशंकर लोखंडे उपस्थित होते.