सोलापूर । राज्यभर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असताना आणि उजनी धरण तब्बल 111 टक्के भरले असताना उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणातील अधिकाऱ्याच्या गलथानपणामुळे भीमा नदी काठच्या लाखो लोकांना महापुराचा तडाखा बसला आहे. वास्तविक पाहता बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणातून अवघा पाच हजार चा विसर्ग सुरू होता.. सोलापूर जिल्हा तसेच उजनीच्या कॅचमेंट एरियामध्ये . पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना उजनीच्या अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता देखील लागला नाही का ? . मंगळवार म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी उजनीतून भीमा नदीत अवघा 5000 चा विसर्ग होता. इकडे धो धो पाऊस पडत असताना उजनी धरणातून बुधवारी म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत उजनी धरणातून अवघा 20 हजारचा विसर्ग होता. त्याच दिवशी दुपारी चार वाजता 50 हजार तर सायंकाळी साडेसहा वाजता तब्बल एक लाख वीस हजार चा विसर्ग सोडण्यात आला. रात्री साडेआठ वाजता हा विसर्ग तब्बल 1 लाख 80 हजार क्युसेक वर पोहोचला. गुरुवारी म्हणजे काल 15 ऑक्टोबर रोजी हा विसर्ग दोन ते अडीच लाखावर नेण्यात आला.
यामुळे एकीकडे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आलेले पाणी आणि उजनी उजनी तून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी पात्र तब्बल तीन ते साडेतीन लाख क्युसेक वेगाने वाहू लागले आहे. भीमा नदी पाठ उजनी धरणा पासून ते अक्कलकोट मधील . हिळळी बंधारा पर्यंत लाखो हेक्टर पिके पाण्यात गेली आहेत आणि त्यांची वित्तहानी आणि जीवित हानी झाली आहे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन पाणी सोडण्यास सुरुवात केली असती तर कदाचित या पुराचा तडाखा कमी बसला असता. त्यामुळे या मानवी महापुरात जबाबदार कोण असा प्रश्न भीमा नदी काठावर शेजारील प्रत्येक गाव विचारु लागला आहे