जिल्हाधिकारी कार्यालयात ढिसाळ नियोजनात पार पडला ध्वजारोहणाचा सोहळा…!

0
31

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ढिसाळ नियोजनाचा अनुभव स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऐवजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. कार्यक्रमांमध्ये कुठेही जोश आणि उत्साह नव्हता. नऊ वाजता हसनमुश्रीफ यांची गाडी आली त्यावेळी ती गाडी नक्की कुठे थांबणार याचे नियोजन व्यवस्थित नव्हते.

सुरुवातीला पायलट गाडी पुढे आली आणि मंत्री मुश्रीफ यांची गाडी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या रॅम्पवरच थांबली. आणि चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा ही गाडी खाली आणण्यात आली. नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करायचे होते चार मिनिटे अगोदरच मुश्रीफांचे आगमन झाल्यामुळे सर्वजण 9:05 वाट बघण्यात अत्यंत निरुत्साही वातावरणात थांबले. झेंडा वरती फडकेल की नाही याची गॅरंटी नसल्यामुळे तो खालीच फडकवून वर नेण्यात आला. ध्वजारोहण झाल्यानंतर मुश्रीफ हे सर्व माजी सैनिकांना भेटतील असे वाटले मात्र अवघ्या एका महिलेला भेटून ते व्यासपीठाकडे गेले.

साहेब काम करा एवढंच ती महिला म्हणाली. भाषण करताना साऊंड सिस्टिम व्यवस्थित नसल्यामुळे मुश्रीपांना अनेक वेळा अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. त्यांचे भाषण ऐकू येत नसल्यामुळे कार्यक्रम रटाळ होत असल्यामुळे उपस्थित अनेकजण मोबाईल मध्ये व्यस्त होते. जिल्हा प्रशासनातील बहुतांश सर्वच अधिकारी या ठिकाणी सिरीयस नसल्याचे दिसून आले. एकूणच ऐनवेळचा पाहुणा म्हणून जिल्हा प्रशासनाने हसन मुश्रीफ यांचा व्यवस्थित प्रोटोकॉल न पाळण्याचेच दिसून आले. यावर आता शासनाचे राजशिष्टाचार विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.