प्रांताधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करा.. रिपाईचे मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन

0
85

पंढरपूर : मंगळवेढा-सांगोला विभागातील नागरिकांच्या तक्रारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांच्याकडे आल्याने मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या विरोधात बुधवारी मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर रिपाईच्या वतीने दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर हे कामानिमित्त आलेल्या सामान्य नागरिकांना अपमानित करत आहेत. कामासाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करीत त्यांच्या भ्रष्टाचाराची व बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन येथील प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या घोषणा मुळे परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामध्ये मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर येथील रिपाईचे कार्यकर्ते सामील झाले होते. मंगळवेढा, सांगोला विभागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांच्याकडे आलेल्या तक्रारी सदर तक्रारीची दखल घेत मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच भ्रष्टाचार व त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांनी केली होती.

Best Software Company In Solapur

या तक्रारी मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की उपविभागीय अधिकारी हे रुजू झाल्यापासून बिगर शेती प्रकरणे निर्णय न देता प्रलंबित ठेवणे व मार्गी लावण्यासाठी पैशाची मागणी करणे,आर.टी.एस अपिलाचे निकाल प्रलंबित ठेवणे, सोलापूर-रत्नागिरी हायवे मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी अडवणूक करणे, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक, महिला कामानिमित्त भेटण्यासाठी गेले असता त्यांना उध्दटपणे बोलणे,नागरिकांना अपमानीत करणे, असभ्य वर्तन करणे, अश्लिल भाषेत बोलणे, कामासाठी हेलपाटे मारण्यास लावणे, पैशाची मागणी करुन ‘लाखो रुपये देऊन मी खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे माझे कुणी काही वाकडे करू शकत नाही’अशी भाषा वापरत आसल्याचा थेट आरोप आर.पी आय कडून करण्यात आला होता. याबाबत त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने बुधवारी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन सचिव दिपक चंदनशिवे, भारत शिंदे, येताळ खरबडे, डि.के साखरे, बालाजी राऊत, वाल्मीक लोखंडे, सिद्धार्थ कसबे, सुरेश मरिआईवाले, नाथा लोकरे, नागा मोरे, अमोल कसबे,सुशिल उबाळे, अनिल कसबे, विजय कसबे, गणेश राठोड, रवि भोसले, विजयकुमार खरे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, महादेव सोनवणे, सुरेश नवले, अमोल कांबळे, प्रशांत कांबळे, निलेश उबाळे, सुरज उबाळे,प्रभावती बाबर, प्यारण गवळी,राही लोखंडे, अविंदा गायकवाड, वैशाली माने, माया खरे, रुपाली कसबे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.