• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2024
in इतर घडामोडी
0
विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर दि.19(जिमाका):- शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, करिअर विषयक मार्गदर्शक सुनील चोरे,नितीन शेळके, श्रीकांत घाडगे, दाजी ओबांसे, डॉ. संदीप तापकीर, राम सुतार तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शासनाने कौशल्य विकास विभागाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्स आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आलेला आहे. शासनाकडून तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध सवलतीच्या कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या कर्ज योजनेचा फायदा घेऊन उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे. तसेच भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या विविध व्याज परताव्याच्या योजना आहेत. तरुणांनी नोकरी न करता उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे तसेच पर्यटन क्षेत्रात करिअर करावे. उद्योग उभारून रोजगार मागण्या पेक्षा रोजगार देणारे व्हावे असे त्यांनी यावेळी सांगितले.



प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या शिबिरास एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.शिबिरामध्ये विदयार्थ्यांना नामवंत शिक्षण तज्ञांकडुन भविष्यातील शिक्षण व करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

Next Post

सोलापूरच्या 250 कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
सोलापूरच्या 250 कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी

सोलापूरच्या 250 कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी

ताज्या बातम्या

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026