नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी – भाग्यश्री जाधव
सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांच्या भरारी पथक क्र. २ ने मौजे उपळाई (खु), ता. माढा येथे केलेल्या धडक कारवाईत अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत १६ लाख २१ हजार ५४०किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १५ सप्टेंबर २०२५ रोजी खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.
जप्त मुद्देमालात समाविष्ट:
- गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या १०५ बाटल्या
- १८० मिलीच्या २८८ बाटल्या
- ५०० बनावट लेबल, १८०० बनावट बुचे
- महिंद्रा बोलेरो पिकअप, मारुती सुझुकी एस-क्रॉस, टीव्हीएस ज्युपिटर मोटारसायकल
कारवाईचे नेतृत्व:
ही कारवाई अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, प्रभारी उपअधीक्षक श्री जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक श्री राकेश पवार, दुय्यम निरीक्षक श्री अमित नागरे, तसेच जवान योगिराज तोग्गी, नंदकुमार वेळापूरे, युवराज टेळे, आबासो कसबे, महिला जवान कल्पना जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. गुन्ह्याचा तपास श्री अमित नागरे करीत आहेत.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल:
या कारवाईत अमोल दत्तात्रय फडतरे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विभागीय आकडेवारी:
- एप्रिल ते सप्टेंबर २०२५ दरम्यान परराज्यातील मद्य साठा व वाहतूकविरोधात १० गुन्हे, १२ आरोपी, ९ वाहनांसह ₹७३.१४ लाखांचा मुद्देमाल
- १ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान १०८ गुन्हे, १०२ आरोपी, ९ वाहनांसह ₹५५.९७ लाखांचा मुद्देमाल
- जप्त मद्य व रसायन: ४०,११० लि. रसायन, ५१४० लि. हातभट्टी दारू, ९१८ लि. देशी मद्य, ८९७ लि. परराज्यातील विदेशी मद्य, ५६३ लि. ताडी
माहिती देण्यासाठी संपर्क:
अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतूकविरोधात कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले.