• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात स्टार्टअप यात्रा कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठात स्टार्टअप यात्रा कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.13- स्वयंरोजगार व उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पार पडले. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नवनवीन कल्पना जाणून घेतल्या. शासन विद्यार्थ्यांना निश्चितच मदत करेल तसेच उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी विविध योजना आणल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्यासह जिल्हा कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांची उपस्थित होती. संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात स्टार्टअप यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पना सुरुवातीला जाणून घेतल्या. सिंहगड, कोर्टी कॉलेजच्या वैष्णवी माळी, संदीप क्षीरसागर, प्रियदर्शनी महाडिक यांनी यावेळी कल्पनांचे सादरीकरण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कल्पनेतूनच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय निर्माण होऊन पुढे येतात. विद्यार्थ्यांनी भौगोलिक परिस्थिती, भविष्याचा विचार करून चांगल्या कल्पना आणाव्यात. स्किल डेव्हलपमेंट आणि इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्या कल्पनांना स्टार्टअप करण्याचे काम शासनाकडून होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठ्या हिमतीने आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या कल्पनांचा व उद्योग व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्र-कुलगुरू डॉ. गादेवार म्हणाले की, उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहे. वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी पूर्ण क्षमतेने मार्गदर्शन करण्याबरोबरच शासनाच्यावतीने त्यांना निधीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीची यासाठी मदत मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

Previous Post

सोलापूरच्या विकासासाठी ‘हे’ झाले महत्त्वाचे निर्णय..!

Next Post

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
Next Post
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

ताज्या बातम्या

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026