• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे १०० वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
December 28, 2023
in मुख्य बातमी
0
सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे १०० वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
0
SHARES
1
VIEWS
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे नाट्य व सिने कलावंत भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन
  • सोलापूर येथे नॉर्थकोर्ट प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनास नाट्य कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
  • या नाट्य संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात येणार

सोलापूर, दिनांक 28 ( जिमाका):-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसूली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली जात आहेत. परंतु पुणे विभागात पिंपरी चिंचवड व सोलापूर येथे हे नाट्यसंमेलन आयोजित केले जाणार असून, सोलापूरचे नाट्य संमेलन दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन 100 वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

नॉर्थ कोर्ट प्रशाला येथे शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री तथा नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, नाट्य व सिने अभिनेता भाऊ कदम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार तथा संमेलनाचे कार्य अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, विजय साळुंखे, तेजस्विनी कदम, प्रशांत बडवे, मोहन डांगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सोलापूर येथे यापूर्वीही संमेलने झालेली आहेत त्यामुळे सोलापूरकरांना उत्कृष्ट नियोजनाचा चांगला अनुभव असल्याने हे शंभरावे नाट्यसंमेलन अशा पद्धतीने करावे की त्याची देशभरात दखल घेतली जाईल. यापुढे झालेली व पुढील काळात होणारी सर्व नाट्य संमेलनात सोलापूर येथे झालेल्या व येथे पाहुण्यांचे केलेले आदरतिथ्य व दिलेल्या सर्व सोयी सुविधा याची दखल नाट्यसंमेलनानी घेतली पाहिजे तसेच ते देश पातळीवर आदर्शवत ठरले पाहिजे यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या प्रांगणात दिनांक 20 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत 100 वे नाट्य संमेलन होणार असून, मराठी नाट्य परिषदेने या कालावधीत नाट्य कलावंत ,नाट्य रसिक यांच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे नाटक ठेवायचे तसेच त्यातील सारांश कसा असावा याची सर्व जबाबदारी घ्यावी. या नाट्य संमेलनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. तसेच हे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक सोलापूरकरांनी सहकार्य करावे. संमेलनासाठी आपण स्वतः दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश आज नाट्य परिषदेला देत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही नाट्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले तसेच प्रत्येकाने या संमेलनासाठी सढळ हाताने निधी द्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

मराठी नाट्य परिषदेने या संमेलनासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणण्याची जबाबदारी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महानायक अमिताभ बच्चन आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.
सोलापूर येथील नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. स्थानिक नाट्य कलाकारांनी ही यात सक्रिय सहभाग घ्यावा. सर्व नाट्यप्रेमी नागरिकांनी या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते भाऊ कदम यांनी केले. हे संमेलन आपल्या घरीच होत आहे असे समजून प्रत्येक सोलापूरातील नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारी सर्वस्वी जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. यापूर्वी सोलापूरकरांनी दोन नाट्य संमेलने व एक बाल नाट्य संमेलन यशस्वीपणे पार पाडलेले आहे. हे शंभरावे संमेलन ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सोलापूरकर नागरिक सहभाग देतील अशी अपेक्षा व्यक्त करून या संमेलनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना आणावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिने अभिनेते भाऊ कदम व मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून शतक महोत्सवी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाट्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय साळुंखे यांनी केले तर आभार प्रशांत बडवे यांनी मानले.

Previous Post

अभिनेते अमिताभ बच्चन येणार सोलापुरात; नाट्य संमेलनाचे करणार उद्घाटन

Next Post

युवराज राठोड यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
युवराज राठोड यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

युवराज राठोड यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026