“चला मुलांनो उजेडाकडे” या मोहिमेत सोलापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

0
15
  • सोलापूर – जिल्हयात 11 मे 2022 पासून “चला मुलांनो उजेडाकडे” ही मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेत 6 ते 18 वयोगटातील मुलांची दृष्टीदोष तपासणी आजातागायत सुरु असून या मोहिमेत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आहे. ही मोहिम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
  • जिल्हयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकामार्फेत तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण विभाग याचेमार्फेत जिल्हयातील 0 ते 18 व 6 ते 18 वयोगटातील 9,63,829 मुलामधील ज्या मुलांना दृष्टीदोषाची लक्षणे आहेत. या मुलांची दृष्टीदोष तपासणी “चला मुलांनो उजेडाकडे” या मोहीमेतंर्गत करण्यात येत आहे. यात जिल्हयातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालये, 03 उपजिल्हा रुग्णालये स्तरावर मुलांची दृष्टीदोष तपासणी करण्यात येत आहे.
  • माहे डिसेंबर, 2022 अखेर पर्यत 3,47,430 मुलांची दृष्टीदोष तपासणी झालेली असून यात एकूण 6547 मुलांना दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदयस्थितीत ही मोहित निरंतर चालू आहे. राज्यस्तरावर 3921 मुलाचे चष्मे प्राप्त झालेले असून, त्याची वाटप झालेले आहे. उर्वरीत मुलांचे चष्मे लवकरच प्राप्त होणार आहेत. तसेच सदर मोहिमे दरम्यान 75 मुलांच्या डोळयाचे विविध शस्त्रक्रिया मोहिमे दरम्यान पार पाडलेले आहे. प्रति महिना दृष्टीदोष तपासणी सुरु असून तपासणी झालेल्या दृष्टीदोष मुलांची यादी राज्य स्तरावरुन पाठवली जात आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.