सोलापूर युवक काँग्रेसने वाजविला पेट्रोल पंपावर महागाईचा भोंगा

0
44

येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्रातील मोदी सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर चे दर वाढवित असून त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव प्रचंड वाढले असून नागरिकांचे हाल सुरू आहेत यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचे बगलबच्चे कंपनी कडून देशामध्ये मंदिर मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण सुरू आहे. म्हणून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे लाईन येथील नवल पेट्रोल पंप येथे भोंगा लावून महागाईचा पाढा वाचून मोदी सरकारचा, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण तसेच महंगाई डायन हे गीत ऐकवण्यात येऊन मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे परिसर दणाणून गेला.

केंद्रातील मोदी सरकारने महागाई विरोधात मतं मागुन सत्ता मिळवली आणि या आठ वर्षाच्या कार्यकाळात ६५ रुपयांचे पेट्रोल१२५/-, ५५ रुपयांचे डिझेल १००/-, पार, 350 रुपयांचे गॅस सिलेंडर ९७०/- एवढे प्रचंड दरवाढ केली. गॅस सिलेंडरची सबसिडी ही बंद केली. या दीड दोन महिन्यात तब्बल १५ वेळा पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर चे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक महाग झाली त्यामुळे खाद्यतेलासह सर्वच वस्तूंचे भाववाढ झाली आहे. नागरिकांना, महिलांना घर चालविणे मुश्किल झाले आहे. या प्रचंड महागाईमुळे रोजगारावर सुद्धा परिणाम झाला आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला महागाईवर नियंत्रण मिळविता आली नाही. जनता महागाईत होरपळून निघत आहे. गॅस सिलेंडरचे प्रचंड दरवाढीमुळे गोरगरीब जनता गॅस सिलेंडर घेऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा चुलीकडे वळत आहेत. जनता महागाईने त्रस्त असून यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार आणि त्यांचे बगलबच्चे जाती धर्मामध्ये भांडणे लावत आहेत. देशभरात मंदिर- मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण करत आहेत. यूपीए सरकारच्या वेळी महंगाई डायन वाटणाऱ्या मोदी सरकारला महंगाई डार्लिंग वाटत आहे. महागाई आणि जनतेचे प्रश्न या विषयी केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांचे बगलबच्चे राजकारणी यांना काहीही सोयरसुतक नाही म्हणून आज रोजी झोपी गेलेल्या बहिऱ्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी भोंगा लावून त्यावर महागाईचा पाढा वाचण्यात आला.

या आंदोलनात युवक कॉंग्रेस चिटणीस प्रवीण जाधव, शहर मध्य विधानसभा वाहिद बिजापुरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुशीलकुमार म्हेत्रे, संजय गायकवाड, बाबुराव क्षीरसागर, सोहेल पठाण, शरद गुमठे, विवेक इंगळे, यासिन शेख, प्रतीक शिंगे, सुनील सारंगी, रोहन साठे, दिनेश डोंगरे, धीरज खंदारे, वैभव माने, गणेश वाघमारे, कृष्णा नाईक, अजय जाधव, रवी नाईक, अनिकेत भिसे, अन्वर फणीमल, प्रथमेश मुकणे, यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.